संत निरंकारी मिशन द्वारे विश्वव्यापी महा रक्तदान अभियान

Google search engine
Google search engine

संतोष कुळे | चिपळूण : मानवतेचे मसीहा बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ दिनांक 24 एप्रिल हा दिवस संपूर्ण निरंकारी जगतात देश विदेशामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करत ‘मानव एकता दिवस’ या रूपात साजरा केला जातो. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मानव कल्याणार्थ संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून भारतवर्षांतील मिशनच्या बहुसंख्य शाखांसह मिशनचे मुख्यालय असलेल्या राजधानी दिल्लीमध्ये देखील ल महा रक्तदान अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये मिशनचे अनुयायी मोठ्या संख्येने स्वेच्छेने व उत्स्फूर्तपणे रक्तदान करतील.

सर्वांस विदितच आहे, की युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांनी सत्याचा बोध प्रदान करून मनुष्य जीवन समस्त भ्रमापासून मुक्त करण्याचे अलौकिक करी केले; त्या बरोबरच समाज उत्थानासाठी अनेक कल्याणकारी योजना क्रियान्वित केल्या. त्यामध्ये साधे विवाह, नशा मुक्ति तसेच युवा वर्गाला खेळांच्या प्रति प्रेरित केले. समाजात व्याप्त अनिष्ट गोष्टीच्या त्या कालखंडानंतर बाबा हरदेवसिंहजी यांच्या ‘रक्त धमण्यांमध्ये वाहावे , नाल्यांमध्ये नको ‘  या प्रेरक संदेशातून समस्त निरंकारी भक्तांना एक नवी सकारात्मक दिशा मिळाली. तोच प्रेरक संदेश जीवनात उतरवत निरंकारी भक्त लोककल्याणार्थ आपल्या सेवा प्रदान करत आले आहेत.

संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजाजी यांनी या अभियानाची विस्तृत माहिती देताना सांगितले, की हे महाअभियान भारतातील संत निरंकारी मिशनच्या सर्व 99 झोन मधील बहुसंख्य शाखांमध्ये राबविले जाईल. त्यामध्ये रक्तदान शिबिरांच्याआयोजना पूर्वी केली जाणारी तपासणी व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. त्या बरोबरच रक्तदात्यांसाठी चहापानाची उचित व्यवस्था केली जाणार आहे. रक्त संकलनासाठी इंडियन रेडक्रॉस, संत निरंकारी रक्त पेढी व अन्य सरकारी रक्त पेढ्यांचे प्रशिक्षित चमू येणार आहेत.उदात्त लोक कल्याणकारी हेतूने आयोजित या अभियानामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानवतेच्या दिव्य शिकवणुकीची छाप दिसून येईल जिचा अंगीकार करून निरंकारी जगतातील समस्त भक्तगण प्रेरणा प्राप्त करून आपले जीवन कृतार्थ करत आहेत.