भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
वैभववाडी | नरेंद्र कोलते : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शनिवार दि. 22 एप्रिल 2023 रोजी श्री वाघजाई देवी वर्धापन सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा खालीलप्रमाणे – 22 एप्रिल रोजी सकाळी 5.30 ते 6 वा. – श्री वाघजाई देवीचा अभिषेक, सकाळी – 6 ते 7 वा. होमहवन, सकाळी 9 ते 11 वा. ढोल ताश्याच्या गजरात श्री वाघजाईदेवी पादुकांची भव्य मिरवणूक (गयाळवाडी ठिकाणदार ढोल पथक मुटाट, देवगड), 11.30 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा,दुपारी 12.30 ते 2.30 वा. सर्व भाविकांना महाप्रसाद, दुपारी 3 ते 4 – महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, सायंकाळी 4 ते 5 – महिलांचा फुगडी कार्यक्रम -श्री देवी चांमुडेश्वरी महिला फुगडी मंडळ कविल कट्टे कुडाळ,
सायंकाळी 5 ते 6 – महिलांसाठी मनोरंजन कार्यक्रम आणि आकर्षक बक्षिस, रात्री – 8 वाजता – भट्टीवाडी ग्रामस्थ सुस्वर भजन, रात्री 8.30 वाजता – शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप कार्यक्रम, रात्री 9 वा. – श्री देवमहापुरुष गोफनृत्य कार्यक्रम प्रस्तुत त्रिंबक आरेकरवाडी, मालवण,भट्टीवाडी सेवा मंडळ, मुंबई आणि भट्टीवाडी ग्रामस्थ मंडळ, करुळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना आपण सहकुटुंब, सहपरिवार मित्रमंडळीसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.