अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील २७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणावरून सिंधुदुर्गात येऊन घेणार योजनेचा आढावा

जिल्हाधिकारी, राष्ट्रीयकृत व अर्बन बँक अधिकारी यांच्या घेणार बैठका

कणकवली (प्रतिनिधी )
भाजपा आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणा वरून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे गुरुवार २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान ते सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांसमवे विविध विषयांचा आढावा घेणार आहे. राष्ट्रीयकृत बँका, अर्बन बँका, त्यांच्या माध्यमातून मराठा तरुण-तरुणींना तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या होतकरूंना महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळतो आहे याचा ते आढावा घेणार आहे.भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना ग्रामीण भागातील मराठा तरुणांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यासाठी काम करणारे प्रशासना, अधिकारी आणि बँक अधिकारी यांच्या समवेत एकत्रित बैठक व्हावी आणि ती बैठक स्वतः अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सिंधुदुर्गात येऊन घ्यावी असे आग्रहाचे निमंत्रण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिले होते.मराठा समाजातील उद्योग करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला १५ लाखापर्यंत चे बिनव्याजी कर्ज या महामंडळा कडून दिले जाते. या सर्व कामकाजाचा आढावा या दौऱ्या दरम्यान अध्यक्ष नरेंद्र पाटील हे घेणार आहेत.त्यासाठीच आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणाला मान देऊन अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे गुरुवार २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा पुढील प्रमाणे,सकाळी ११.३० सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व राष्ट्रीयीकृत बँकर्स, DCO,सहकारी बँक ची अध्यक्ष नरेंद्र पाटील हे बैठक घेतील.दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहे.दुपारी २ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला भेट देतील. सायंकाळी ५ वाजता जिल्हा भाजप कार्यालयाला भेट देतील.असा त्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौरा राहणार आहे.