सिंधुनगरीतील जादूगार सलोनी धुरीची पुणे येथील राष्ट्रीय जादू परिषदेत चमक!

सिंधुनगरी | प्रतिनिधी

सिंधुनगरीतील व तारकर्ली मालवण येथील मूळ रहिवासी सलोनी पांडुरंग धुरी ही एक जादूगार कलाकार म्हणून आता समोर आली आहे. पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेत तिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ती दुसऱ्या इयत्तेपासून आपल्या वडिलांसोबत जादूचे प्रयोग करत असून एक नवी जादूगार म्हणून जादूगार परिषदेच्या निमित्ताने समोर आली आहे.

सिंधुनगरी येथे वास्तव्यास असलेली व पणदूर हायस्कूलमध्ये बारावी इयत्तेत असलेली जादूगार सलोनी हिने आतापर्यंत 40 च्या वर छोटे-मोठे प्रयोग केले आहेत. गोवा येथे झालेल्या जादूगार स्पर्धेतील सहभाग घेतला होता तर पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय जादू संमेलनातही तिचा सहभाग होता. नुकत्याच पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेत झालेल्या स्पर्धेमध्ये तिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.तिचे वडील पांडुरंग धुरी हे पोलीस कर्मचारी असून त्यांनीही पोलीस दलात कार्यरत असताना छोटे मोठे जादूचे प्रयोग केले आहेत. जादूची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या काही शोमध्ये तिने काम केले असून इयत्ता दुसरी पासूनच ते जादूचे धडे घेत आहे. टीव्ही स्टार जादूगार अतुल पाटील जादूगार आर्यन पुणे यांचेही ती मार्गदर्शन घेणार असून तिने आपल्या करिअरचे जादूगार क्षेत्र निवडले आहे.