तब्बल 22 वर्षांपासून त्याचा पोलिसांना गुंगारा… लेकिन कानून के हाथ बहोत लंबे होते है |

For almost 22 years he has been lying to the police… Lakin Kanun ke haath bahot dalm hote hai |

खेड | : तब्बल 22 वर्षांपासून फरारी असलेला खुनाच्या आरोपतील संशयिताला अखेर खेड पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्वतःच्या खोट्या मृत्युंचा बनाव करत अनेक ठिकाणे बदलत असूनही अखेरीस या संशयिताला कानूनके हाथ बहोत लंबे होते है याचा अनुभव आला आणि उत्तरप्रदेश येथून त्याला पकडण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी सुरेशचंद्र राम खिलावन खितवास उर्फ सरोज, (सध्या वय 50 वर्षे रा. खिमी पुरइन, तालुका खागा जिल्हा फतेहपुर, राज्य उत्तर प्रदेश) व मयत सखाराम जानू मांजरेकर (वय 38 वर्षे रा. कोळंबे, भरनकटवाडी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) हे लोटे MIDC तालुका खेड येथील Fire Tech Equipment and Systems Pvt. Ltd. या कंपनी मध्ये एकत्र कामाला होते.

सुरेशला “रात्रीच्या जेवणामध्ये मच्छी मिळाली नाही”, याचा राग मनात धरून त्याने सखाराम जानू मांजरेकर याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केला होता. या प्रकरणी खेड पोलीस ठाणे येथे भा.द.वि. संहिता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खेड पोलीस ठाणे येथील प्रलंबित असणारे, पाहिजे व फरारी त्आरोपीचा शोध घेणेकामी एक पोलीस तपास पथक तयार करण्यात आले व या पथकाद्वारे, जुन्या अभिलेखांची पडताळणी, गोपनीय माहिती तसेच उत्तर प्रदेश राज्यातील स्थानिक पोलीसांच्या आधारे आरोपीस शोधण्यात आले व दिनांक 18/04/2023 रोजी नमूद आटोपी हा खेड पोलीस ठाणे तपास पथकाला मिळून आला व त्यास उत्तर प्रदेश राज्यातून ताब्यात घेऊन गुन्ह्याचे तपास कामी अटक करण्यात आलेली आहे.

यातील आरोपी हा गुन्हा केल्यापासून, 27 वर्षे आपल्या वास्तव्याची ठिकाणे बदलून अस्तित्व लपवत असल्याचे तसेच त्याने सन 2008 मध्ये स्वतःचा बनावट मृत्यू दाखला बनवून आपण मयत झाल्याचे भासवून लपून राहत असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई, खेड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तथा (तपासी अधिकारी) श्री. सुजीत गडदे तसेच त्यांच्या पथकातील खालील नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली.

1. पोउनि श्री. सुजीत सोनावणे, खेड पोलीस ठाणे,

2. PC/1291 अजय कडू, खेड पोलीस ठाणे

3. PC/962 वैभव ओहोळ, खेड पोलीस ठाणे

4. PC/1010 राम नागुलवर, खेड पोलीस ठाणे व

5. PC/1199 तुषार झेंड, खेड पोलीस ठाणे.

 

“या गुन्ह्याच्या तपासामध्ये व फरारी आरोपीस अटक करण्याकरीता सहभागी, पथकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन” जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे