Free eye checkup camp on 25th by NAB Eye Hospital Sawantwadi
मळगांव ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी, मळगांव ग्रामपंचायत आणि भाजपा मळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने २५ एप्रिल रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मळगांव कुंभार्ली येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीत २५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत हे शिबिर घेण्यात येणार आहे.
या शिबिरात नेत्र तपासणी मोफत केली जाणार असून औषधे तसेच नेत्र शस्त्रक्रिया हे अत्यंत माफक दरात केले जाणार आहेत. नेत्र शस्त्रक्रिया अत्यंत कुशल डॉक्टर व अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून केली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी तसेच मळगांव ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले आहे.