अजित दादा सांगतायेत एक पण राष्ट्रवादीत घडतंय मात्र वेगळंच!

Ajit Dada says that something is happening in NCP but different!

पुणे :  आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं असलं तरी देखील वातावरण वेगळ असल्याचे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच देत आहे. राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाचं शिबीर पार पडलं, या शिबीरात सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचं नाव नव्हतं. तसेच आता कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी बनवण्यात आली आहे, त्यामधून देखील अजित पवार यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाच्या शिबीराला देखील अजित पवार अनुपस्थित होते. याबाबत त्यांना विचारले असता माझा पुणे दौरा नियोजित होता. त्यामुळे मी तिकडे गेलो नाही. उगाच शंका, कुशंका काढू नका असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. मात्र आता स्टार प्रचारकाच्या यादीतूनही नाव वगळण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.