त्रिंबक उपकेंद्र येथे शवपेटी ठेवण्यास हरकत घेतल्याने त्रिंबक ग्रामस्थ झाले आक्रमक

Trimbak villagers became aggressive as they objected to keeping the coffin at Trimbak sub-centre

पोलीस निरीक्षक कोरे यांच्या मध्यस्थीने वाद क्षमला

आचरा | अर्जुन बापर्डेकर :त्रिंबक गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शवपेटीची गरज भासल्यास कणकवली मालवण गाठावे लागत होते ही गरज ओळखून ग्रामविकास समिती त्रिंबक यांनी निधी गोळा करत त्रिंबक गावासाठी शवपेटी खरेदी करत ग्रामपंचायत कडे सु्पूर्द केली होती सदर शवपेटी त्रिंबक ग्रामपंचायतने आचरा आरोग्य विभागला विनंती करत त्रिंबक उपकेंद्र येथे तात्पुरती ठेवली होती. मात्र आचरा प्राथमिक आरोग्य केंदा चे वैद्यकीय अधिकारी डॉ शामराव जाधव आणि डॉ कपिल मेस्त्री यांनी त्रिंबक ला भेट देवूनग्रामपंचायत ला पत्र काढत सदर शवपेटी अन्य ठिकाणी हालवण्यास सांगितले आणि त्याची प्रत आचरा पोलीसांना सादर केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत शनिवारीआचरा आरोग्य केंद्रात धडक दिली यावेळी आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी संतप्त ग्रामस्थांना शांत करत प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी कांबळे यांच्याशी सपंर्क साधून पेटी ठेवण्यावर तोडगा काढत केलेल्या यशस्वी शिष्ठाइमुळे पेटी ठेवण्यावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला.

त्रिंबक उपआरोग्य केंद्रात पेटी ठेवण्यास आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी हरकत घेतल्यानंतर त्रिंबक गावचे सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे, सुरेंद्र सकपाळ, डॉ सिद्धेश सकपाळ, संतोष घाडीगांवकर, विलास त्रिंबककर,विजय सावंत, चंद्रशेखर सुतार, विनायक त्रिंबककर,बाणे व अन्य ग्रामस्थांनी आचरा आरोग्य केंद्रात धडक दिली व पत्राबाबत आरोग्य केंद्रात उपस्थित असलेले डॉ शामराव जाधव, डॉ कपिल मेस्त्री यांना जाब विचारत पत्राबाबत संताप व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांनी या बैठकीला आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना बोलाविले होते ‌ते आचरा आरोग्य केंद्रात दाखल झाले होते.

आचरा आरोग्यकेंद्रास पूर्वकल्पना देऊन पेटी ठेवण्याची सोय होईपर्यंत शवपेटी त्रिंबक उपकेंद्र येथे ठेवली होती मात्र त्यानंतर आचरा वैद्यकीय अधिकारी यांनी शुक्रवारी 21 रोजी पत्र काढत उपकेंद्र येथे ठेवण्यात आलेली शवपेटी हि उपकेंद्र येथे न ठेवता ही सदरची शवपेटी हि ग्रामपंचायत स्तरावर अन्य ठिकाणी व्यवस्था करावी तसेच पेटी हि उपकेंद्र ठिकाणी ठेवता येत नाही, तसेच ज्या प्रा.आ.केंद्र ठिकाणी शवविच्छेदन इमारत नाही अशा ठिकाणीसुद्धा ठेवा देत नाही तरी त्याबाबत कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग याच्याकडून मार्गदर्शन घेण्यात आलेले आहे तरी सदर ची शवपेटी अन्य ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी असे त्रिंबक सरपंच यांना पत्राद्वारे कळवले होते .

गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शवपेटीची गरज भासते त्यावेळी आरोग्य केंद्र कोणत्याही सुविधा पुरवत नाही . अशा प्रसंगी ग्रामस्थांना कणकवली मालवण गाठावे लागते ही गरज ओळखून ग्रामविकास समिती त्रिंबक यांनी निधी गोळा करत त्रिंबक गावासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च करून शवपेटी खरेदी केली तिची देखभाल साठी खाजगी माणूस नेमला.वापरा नंतर निर्जंतूकिकरण करून ग्रामपंचायतजवळ पेटी ठेवण्यासाठीच्या इमारतीचे बांधकाम होईपर्यंत शवपेटी सुरक्षित रहावी म्हणून उपकेंद्र येथे आरोग्य विभागास विनंती करून ठेवण्यात आली होती .आचरा आरोग्य विभाग याला हरकत घेत आहेत आपणही सुविधा द्यायच्या नाहीत आणि दुसरे देत असतील त्यालाही विरोध करायचा असे आडमुठे धोरण आचरा विभाग अवलंबत असल्याने अशा वृत्तीमुळे मदतीस पुढे येणारे युवक, सामाजिक संस्था या मदत करणार नाहीत ते मागेच जातील असे ग्रामस्थांनी सांगत यावेळी आचरा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या कृतीवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला

शवपेटी ठेवण्यास हरकत घेतल्याने आचरा आरोग्य केंद्रात त्रिंबक ग्रामस्थ दाखल झाल्याचे समजताच आचरा पोलीस निरीक्षक शंकर कोरे दाखल झाले होते .त्यांनी ग्रामस्थ यांना शांत करत ग्रामस्थांचे व वैद्यकीय अधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेतले या विषयावर वाद न घालत बसता आपण यावर तोडगा काढू असे सांगत स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोनद्वारे सपंर्क करत निर्माण झालेली परिस्थिती सांगितली यावेळी जिल्हा आरोग्य विभाग अधिकारी कांबळे यांनी 31 मे पर्यंत पेटी ठेवण्यास परवानगी देत असल्याचे सांगत त्यानंन्तर सदर पेटी दुसऱ्या पर्यायी जागेत ग्रामपंचायत घेऊन जाईल असे लेखी पत्र आरोग्य विभागास द्यावे लागेल असे सांगितले या निघालेल्या पर्यायवर ग्रामस्थांनी सहमती दर्शवत 31 मे पर्यंत पेटी आम्ही ग्रामपंचायत च्या जागेत हलणार असल्याचे मान्य केले. आचरा पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या यशस्वी मध्यस्तिनंतर त्रिंबक ग्रामस्थ व आरोग्य विभाग यांच्यात पेटीवरून झालेल्या वादावर अखेर पडदा पडला.