स्वराज्य मित्र मंडळ भगतेवाडी (इंदवटी)संघटने कडून भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील इंदवटी येथील स्वराज्य मित्र मंडळ भगतेवाडी संघटने कडून शुक्रवार दिनांक १२ मे २०२३ रोजी इंदवटी निओशी ग्रामपंचायत मर्यादीत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, शुक्रवार दिनांक १२ मे २०२३ रोजी सकाळी ७ वाजता ही मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सदर स्पर्धा ही इंदवटी निओशी ग्रामपंचायत मर्यादीत असणार आहे.या स्पर्धेच्या युगात आपण शरीरा कडे दुर्लक्ष करतो. आणि विविध आजारांना बळी पडतो. समाज्याला गरज आहे ती सदृढ आणि निरोगी आरोग्याची. युवा पिढीला गरज आहे ती अंगीकृत असलेल्या खेळाडू वृतीला प्राधान्य देण्याची. तसेच प्रत्यकाला गरज असते ती नोकरीच्या सुवर्ण संधीची .ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता धावण्याचे महत्व पटवण्यासाठी उपरोक्त मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे . सदर संकल्पना ही सामाजासाठी उपयुक्त ठरणारी आहे .

सदर स्पर्धा ही मंडळाचे अध्यक्ष प्रकाश भगते. सल्लागार मनोहर भगते. सचिव राजू भगते ,खजिनदार अजय भगते, रामचंद्र दिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. इंदवटी आणि निओशी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि महिला ह्यांनी हा उपक्रम यशस्वी पणे पार पडावा यासाठी सहाय्य केले आहे. स्वराज्य मित्र मंडळ भगतेवाडी या संघटनेचे प्रत्येक सभासद या उपक्रमाला मोलाचं सहकार्य करीत आहेत. तसेच इंदवटी आणि निओशी गावातील युवावर्ग, शालेय विध्यार्थी आणि ८ वर्षापुढील वयोगटातील प्रत्यकासाठी ह्या स्पर्धेत भाग घेता येईल.त्या साठी नोंदणी करणे अनिवार्य आहे .
इच्छुक खेळाडूंनी योगेश भगते८४५९६९८२३२
सचिन तांबे ८८०६२३३७६२, संदीप भगते ९३२१२३०६६४, रुपेश भगते ९४२२५६५९६८
यांच्याशी संपर्क करून नोंदणी फॉर्म भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.