दोडामार्ग l सुहास देसाई : तालुक्यातील मांगेली – कुसगेवाडी येथील डोंगर घसरून आज पहाटेच्या सुमारास भूस्खलन झाले. सदर डोंगराची माती रस्त्यावर आल्याने पहिली सकाळची बस मांगेलीत अडकून पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची गैरसोय झाली.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वी या भागात भूस्खलन झाल्याच्या आठवणी मांगेली ग्रामस्थांच्या मनात उमटल्या. तसेच तेथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.