मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यात जलजीवन मिशन योजेनेचा उद्घाटन समारंभ अनेक टिकाणी होत असून स्थानिक आमदार व शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून लावण्यात येणाऱ्या बॉनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्याचे टाळले जात असून भाजप शिवसेना युती असतानादेखील स्थानिक पदाधिकार्यानां डावलले जात असल्याची खंत तालुक्यातील भाजपा पदाधिकार्यानांकडून व्यक्त होत आहे.याबाबत नुकतीच भाजपा तालुका कोअर कमिटीची बैठक मंडणगड भाजपा तालुका अध्यक्ष विश्वदास लोखंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण मोरे, सरटिणीस गिरीश जोशी, अशोक गोविलकर, शहरअध्यक्ष पुष्पराज कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली असून याबाबत भाजपा वरिष्ठ नेत्यांकडे माहिती पाठविण्याचे ठरविण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेली जलजीवन मिशन ही देशात लोकांच्या पहिल्या पसंतीची ठरलेली योजना ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या धोरणात्मक निर्णयाचे फलित आहे. तालुक्यात 103 गावांमध्ये ही योजना पोहचत आहे याकरिता केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपल्या तालुक्यास 52.39 कोटी रुपये इतका विक्रमी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकार व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मानावेत तेवढे आभार थोडे आहेत.
शासकीय योजनेचा लाभ समाजातील षेवटच्या घटकास थेट मिळाला पाहिजे या तत्वाने भाजपा प्रणित केंद्र सरकार काम करीत असल्याने घर घर जल या योजनेतून प्रत्येक नागरीकांच्या घरापर्यंत पाणी पोहचणार आहे. केंद्र सराकरच्या माध्यमातून होत अलेल्या या लोककल्याणकारी योजनेचे भूमिपूजन करताना स्थानिक आमदार श्री. योगेशजी कदम यांना सत्तेत असणा-या मित्रपक्ष भाजपाचा विसर पडलेला दिसत आहे. तसेच मोदींच्या जल जीवन मिषन या महत्वकांक्षी योजनेचे उद्घाटन करत असताना निदान पंतप्रधान व मित्रपक्ष यांचा नामउल्लेख करण्याचेही टाळले जात आहे.
जल जीवन मिशन ही योजना राबविताना नवीन उद्भव विहीर न बांधणे, साठवणूक टाक्यांची पाणी क्षमता न वाढवणे, पुर्वी कार्यान्वीत असलेल्या योजनेचे पाईप नव्या योजनेच्या कामास वापरणे, आवश्यकतेपेक्षा खुपच कमूी नवीन पाईप नव्या योजनेसाठी उपलब्ध करुन देणे, नव्या योजनेच्या अंदाजपत्रकात जून्या योजनेतील पंप हाऊस मशीन यांचा वापर करणे, नवीन अंदाज पत्रकात जनेतेस माहिती न देणे, नवीन अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार ठेकेदाराने काम न करणे, स्थानिकांच्या गरजांचा विचार न करणे अशा आशयाच्या तक्रारी अनेक गावातील ग्रामस्थ विविध माध्यमातून पुढे आणत असल्याने या संदर्भात तालुका भारतीय जनता पार्टी योग्य पध्दतीने लक्ष घालणार असून याची माहिती जल जीवन मिशन केंद्रीय मंत्र्यापर्यंत थेट पुरविली जाणार आहे.