जेष्ठ नागरिक सेवा सघाचा वार्षिक स्नेहमेळावा 26 रोजी

आचरा | अर्जुन बापर्डेकर : जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीचा वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेहमेळावा बुधवार 26एप्रिल रोजी संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सावंतवाडी कॉलेजचे माजी प्राध्यापक सुभाष गोवेकर उपस्थित राहणार आहेत. या स्नेहमेळाव्यात जीवनगौरव पुरस्काराचे वितरण,निमंत्रित गायकांचा गायनाचा कार्यक्रम आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जेष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अशोक कांबळी,उपाध्यक्ष सुरेश गांवकर, सचिव जेएम फर्नांडिस यांनी केले आहे.