विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली

 

मंडणगड | प्रतिनिधी- मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

 

यावेळी आयोजित कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सहा.प्रा. मंगेश ठसाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर टी. वाय. आय.टी मधील वैष्णवी मालप हिने उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी एस. वाय आयटी मधील सर्वेश नेवरेकर या विद्यार्थ्यांने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.