रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्या स्मरणिकेचे बुधवारी प्रकाशन

रत्नागिरी : जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विज्ञान शिक्षक मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन येत्या बुधवारी २६ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ.अशोक नगरकर , राज्य विज्ञान महामंडळाचे अध्यक्ष दिनेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ.अशोक नगरकर गेली 36 वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. सध्या ते वरिष्ठ शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत. देशपातळीवर अनेक राष्ट्रीय मिशन मध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादरीकरण त्यांनी केले आहे. अनेक राष्ट्रीय संस्थांमध्ये व्याख्याने ,प्रशिक्षण व एक्सपर्ट म्हणुन सहभाग घेतला आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर आत्मनिर्भर भारतासाठी देशपातळीवर मिसाईल आणि मिलिटरी टेक्नॉलॉजी साठी विशेष योगदान दिले आहे. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

स्मरणिका प्रकाशन कार्यक्रमाला विज्ञान मंडळाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, विद्यार्थी, स्मरणिकेचे जाहिरातदार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे, उपाध्यक्ष राजू जानकर, कोषाध्यक्ष मोहन पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे.