हातखंबा येथे जुगार खेळणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील हाखंबा तिठा येथे बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणार्‍या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शुक्रवार 21 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वा.करण्यात आली.रविंद्र सोनू मालप (45,रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.शुक्रवारी ग्रामीण पोलिसांना हातखंबा तिठा येथे बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार,ग्रामीण पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.