मेष रास
आज तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात. पूर्वी जो उत्साह होता तो आता जाणवणार नाही. फोकस करण्यात अडचणी येतील. तुम्हालाच त्यात इंटरेस्ट वाटणार नाही म्हणून तुम्ही काम करणार नाही. हातातून एखादी चांगली संधी जाऊ शकते.
वृषभ रास
आज स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जा, यश मिळेल. तुमच्याकडून उत्तम प्रकारचे काम होईल. वडिलांशी चांगले संबंध ठेवण्याचा तसेच भेटण्या बोलण्याचा प्रयत्न करा. घर तसेच कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल. अधिकार मिळतील. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
मिथुन रास
आज तुमचे जे काही प्लॅन्स असतील त्यात यश मिळणार नाही. आज इतरांकडून कसल्याच अपेक्षा ठेवू नका. कुठेही जावेसे वाटणार नाही. तुमचे रस्ते बंद आहेत असे वाटेल.
कर्क रास
आज कशातच मन लागणार नाही. साधे काम करतानाही जमत नाही, सुचत नाही, असे वाटत राहील. स्वतःच्या क्षमतेवर संशय निर्माण होईल. स्वतः होऊन आज एखादे काम, जबाबदारी, अंगावर घेऊ नका.
सिंह रास
आज तुम्ही एका आदर्श योध्या सारखे वागाल. इतर व्यक्ती तुमचे गोड कौतुक करतील. कामानिमित्त प्रवास होतील. इतरांकडून योग्य वेळी साथ आणि मदत मिळेल. कपडे इत्यादी वस्तूची खरेदी करू शकता.
कन्या रास
आज स्वतःमध्ये बदल करा. आज कामे पूर्ण होणार नाहीत. कामात अडथळे येतील. कामे अपूर्ण राहतील. इतरांपासून तुटल्यासारखे, अनोळखी वाटेल. जुन्या सवयी सोडून द्या, त्यामुळे बराच फरक पडेल. तुम्हाला नक्की काय हवे आहे त्याचा एकदा विचार करा.
तुळ रास
आज स्वतःची काळजी घ्या. खरेदी करा, पार्लरमध्ये जा, तसेच आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी करा. गुड न्यूज कळतील. मन खुश असेल. घरात कुटुंबात प्रेम वाढेल. घर सुशोभित करू शकता. तुमची क्रिएटिव्हिटी उत्तम रिझल्ट देईल. आईशी संबंध सुधारतील. त्यांच्यासाठी विशेष काही करता येईल. प्रेग्नेंसी, लग्न, डिलिव्हरी, बाळाचा जन्म, घराचे नूतनीकरण,प्रमोशन अशा छान छान बातम्या कळतील.
वृश्चिक रास
आज घरगुती वादविवादात तुम्हाला पडावे लागेल. इस्टेटी वरून हे वाद होण्याची शक्यता आहे. परंपरागत चालत आलेल्या काही गोष्टींना विरोध झाल्यामुळे ताणतणाव वाढतील. लॉंग टर्म प्लॅनिंगचा आता विचार करू नका.
धनु रास
आज तुम्हाला प्रॉब्लेम्स काय आहे ते समजून घेऊनच पुढे जावे लागेल. खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. शारीरिक त्रास होत असेल तर डॉक्टरकडे जा. मनातल्या गोष्टी बोलून टाकायचा प्रयत्न करावा लागेल. तुमच्या चुकीच्या सवयींमुळे अडचणी येतील.
मकर रास
आज शांतपणे काम करा. कोणतेही काम करण्यापूर्वी मनाचा कौल घ्या. योग्य वाटले तरच ते काम करा. काही गुप्त गोष्टी कळतील. मंदिरात जाण्याचा, देवदर्शन करण्याचा, तसेच अध्यात्मिक वाचन करण्याचा लाभ होईल. स्त्रियांशी आदराने वागा.
कुंभ रास
आज सतत मन भूतकाळात जात राहील. जुन्या आठवणी, जुने दिवस, वेगवेगळ्या रुपात तुमच्यासमोर येत राहतील. जवळच्या व्यक्तीचा दुरावा सहन करावा लागू शकतो.
मीन रास
आज दिवस आनंदात जाईल. मनात शांतता आणि प्रेम असेल. प्रेमाचा प्रवेश तुमच्या लाईफ मध्ये होऊ शकतो. एकूण सर्वच बाबतीत आनंदी वळणे घेणारा दिवस आहे.
@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
+++++++++++++++++++++++++++++++













