प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सत्यजित चव्हाण, मंगेश चव्हाण यांना केली अटक

रत्नागिरी | प्रतिनिधी :

राजापूर प्रतिनिधी शासनाकडून रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणी बाबत पावले उचलली जात असून लवकरच बारसू, सोलगाव परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. या एकूणच पार्श्वभूमीवर प्रकल्प विरोधकांना भडकविण्याचा प्रयत्न करणारा प्रकल्प विरोधी एनजीओचा म्हणून काम करणारा सत्यजित चव्हाण याला रत्नागिरीत पोलीसांनी अटक केली आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मणा होऊ नये, चव्हाण याच्याकडून कोणताही दखलपात्र गुन्हा घडू नये यासाठी 151 (3) प्रतिबंधत्माक कारवाई म्हणून पोलिसांनी चव्हाण याला अटक केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. तसेच त्यांच्या साथीला असलेले मंगेश चव्हाण यांना देखील अटक करण्यात आली आहे. तशी माहिती पोलिसानी दिली आहे

या दोघांनाही रविवारी सायंकाळी उशीरा राजापूर न्यायालया समोर हजर करण्यात आले आहे