बांदा / पेडणे (प्रतिनिधी) : केरी पेडणे येथे २३ जणांचा ग्रुप किनारी फिरण्यासाठी आले असता त्यातले चार जण सेल्फी काढत असताना समुद्राच्या लाटात वाहून गेलेत. त्यामध्ये दोन मुलगी व दोन मुलांचा समावेश आहे. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. त्यात २० वर्षाची मुलगी आणि २४ वर्षांचा मुलगा आहे. दोघांचे मृतदेह आढळून आलेले नाहीत. शोध पथकाला मृतदेह शोधताना अडचणी येत असल्याने शोध मोहीम थांबली.
सेल्फी काढत असताना मोठी लाट आल्यामुळे आणि जोराचा वारा असल्याने चौघे लाटे बरोबर पाण्यात वाहून गेले. त्यांना वाचवण्यासाठी एक मुलाने पाण्यात उडी घातली. मात्र तो सुखरूप बाहेर आला. त्याला अधिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
एकंदर पेडणे पोलीस दत्ताराम रावत, मोपा पोलीस निरीक्षक निनाद देविळकर, लाईफ गार्ड आणि शोध घेण्यासाठी अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत. सदर मंडळी कांडोळी व म्हापसा येथून आले होते.