Sachin Tendulkar in Sindhudurga to celebrate his birthday
परुळे भोगवे किनाऱ्यावर पर्यटन सफरीवर
परुळे : शंकर घोगळे
जगभरातील क्रिकेट प्रेमीचा लाडका व भारतीय क्रिकेट विश्वाचा देव सचिन तेंडुलकर परुळे गावांतील सागर किनारी अवतरला. त्याने परुळे गावातील समुद्री पर्यटनाचा आनंद लुटला
भोगवे, किल्ले निवती सागर किना-यावर त्याने पर्यटनांचा आनंद घेतला.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपला ५० वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्यातुन वेळ काढून त्याने सिंधुदुर्ग जिल्हयाच पर्यटन स्थळाना भेट देत आपला 50 वा या वाढदिवस साजरा करीत आहे. काल सायंकाळी त्याने परुळे भोगवे यथील हॉटेल मध्ये मुक्काम केला. किल्ले निवती भोंगवे सागर किनान्याला फेर फटका मारला. यावेळी सर्वच क्रिकेट प्रेमीमा त्यांच्या दर्शनाने खुपच आनंद झाला. त्याने सर्वासोबत फोटो सेशन ही केले. यावेळी त्याच सहकारी उपस्थीत होते. क्रिकेटच्या निमिताने सचिन जगभर फिरले आहेत परंतु भोगवे – निवती सारखा सुंदर स्वच्छसागर किना-यावर फिरताना आपल्याला विशेष आनंद झाला असे त्याने सांगितले.