Sunil Pawar as President of Maharashtra Guhagar Federation of Information Rights Workers
सचिवपदी आशिष कारेकर
गुहागर | प्रतिनिधी : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र गुहागरच्या अध्यक्षपदी सुनील पवार तर
सचिवपदी आशिष कारेकर यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. सहयाद्री शिक्षण संस्था सावर्डे येथील सभागृहात पार पडलेल्या फेडरेशनच्या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर, सचिव समीर शिरवाडकर जिल्हाध्यक्ष सुशांत मराठे,जिल्हा सचिव पद्ममनाभ कोठारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.
सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे तसेच गुहागरचे माजी सभापती सुनील पवार यांच्या एकुणच कामकाजाची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.आपण आपल्यावर दिलेली ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू तसेच सर्वांना सोबत घेऊन संघटनेचा विस्तार गुहागर तालुक्यात अधिकाधिक प्रमाणात करू अशी ग्वाही यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली.या कार्यकारणीमध्ये उपाध्यक्षपदी गणेश कुलकर्णी,कार्याध्यक्षपदी मनोज पाटील,सहसचिवपदी महेश जाधव,मुख्य संपर्कप्रमुखपदी अक्षय पवार,प्रचारप्रमुखपदी किरण अवेरे,मुख्य संघटकपदी मनेष चव्हाण यांची निवडदेखील जाहीर करण्यात आली.या निवडीबद्दल सुनील पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.