गावडे आंबेरेला कायमस्वरूपी तलाठयाची प्रतिक्षा

Gawade Ambarela is waiting for Talathi forever

गावखडी | वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे सजाला कायमस्वरूपी तलाठयांची नेमणूक करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे निवेदन पावस राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागप्रमुख संतोष पोकडे यांनी रत्नागिरी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे मौजे गावडे आंबेरे सजाअंतर्गत चार महसूली गावे येत असून ही गावे अंदाजे १०किलोमीटरपर्यत दाटीवाटीने विखुरलेली आहेत काही गावांतील वाडया अतिशय दुर्गम असल्याने जाण्या -येण्यासाठी प्रवास करणे अवघड आहे गावडे आंबेरे सजा कार्यालयात गेली दोन वर्षे कायमस्वरूपी तलाठी नाही या गावचा कार्यभार नजीकच्या पावस मंडल कार्यालयातील प्रभारीच्या हाती देण्यात आल आहे त्यांना व्यस्त कारभारामुळे गावडे आंबेरे सजाला कार्यालयीन वेळ देणे शक्य होत नाही त्यामुळे येथील नागरिकांची परवड होत आहे गावडे आंबेरे कार्यालयात कायमस्वरूपी तलाठीची नेमणूक करून मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे