After 27 years, students of class 10 brought together old memories…
‘शिरोडा गावी..इयत्ता दहावी बॅच ९६’ ग्रुप
वेंगुर्ले | प्रतिनिधी : ना अभ्यासाचा विचार…ना परीक्षेचं टेन्शन..पण शाळेची ओढ..यामुळेच पुन्हा एकदा एकत्र येण्याची कल्पना समोर आली आणि बघता बघता तो दिवस उजाडला. काल रविवारी शिरोडा सावंतवाडी मार्गावरील मळेवाड येथील हॉटेल राजगड येथे पुन्हा एकदा सकाळी १०.३० वाजता शाळेच्या वेळेत आम्ही सर्व १० वी चे विद्यार्थी एकत्र आलो. यामध्ये रुपेश साळगावकर, सुप्रिया डांगरे, संजय नार्वेकर, दाजी नाईक, अभय परब, किशोर नाईक, प्रवीण आरोसकर, शंकर तारी, आब्रास मेनास, अभिजीत सोनसुरकर, नितीन पोकरे, गोविंद चिपकर, श्रद्धा वारखंडकर, गीता आरोलकर, कविता बांदेकर, गुलाबी गोवेकर, समता नाटेकर, वनिता पालकर, मयुरेश नातू, पल्लवी परब, हर्षद मोर्जे, कृष्णा आचरेकर, किशोर धावडे, आनंद शेटये, आत्माराम आचरेकर यांचा सहभाग होता.
आजच्या या गेट टुगेदर कार्यक्रमात जुन्या नव्या आठवणींना उजाळा मिळाला. हायस्कूल मध्ये शिक्षण घेतनाचे अनुभव आणि आता प्रापंचिक व्यवहारात काम करतानाचे अनुभव एकमेकांनी मांडल्या. दरम्यान यावेळी वर्षातून एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविण्या बाबत चर्चा झाली. हायस्कूल ला भेट, हायस्कूल मधील गरजू विद्यार्थ्यांना आपल्या परीने मदत या बाबत सर्वांचे एकमत झाले. या बॅच मधील २५ जण आजच्या पहिल्या कार्यक्रमात आपल्या कामाचा वेळ काढून सहभागी झाले होते. मुंबई, गोवा, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि शिरोडा येथे राहणारे सर्वजण त्यावेळचे विद्यार्थी इतक्या वर्षांनी एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता.बॅचमधील दोन विद्यार्थ्यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.दरम्यान दिवस भर आठवणींना उजाळा देतानाच नव्या संकल्पना मांडून सायंकाळी केक कापून कार्यक्रमाची सांगता झाली, आणि दरवर्षी एकत्र येण्याचे ठरवून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला