अभिनव फाऊंडेशनच्या पदाधिका-यांनी घेतली विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांची भेट

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीच्या खाजगी दौर्‍यावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गचे पदाधिकारी डॉ.प्रसाद नार्वेकर,श्री.किशोर चिटणीस, श्री.अण्णा म्हापसेकर,श्री.जितेंद्र मोरजकर,श्री.राजू केळूसकर यांनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी त्यांना अभिनवच्या विविध कार्यक्रमांची व उपक्रमांची माहीती देण्यात आली. तसेच त्यांच्यासोबत वाढत्या बेरोजगारी वरही चर्चा झाली. यावेळी पर्यटन पुरक व्यवसाय व आयटी क्षेत्रातील उद्योग सिंधुदुर्गात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करु, असे आश्वासन श्री. नार्वेकर यांनी दिले.

Sindhudurg