आमदार नितेश राणेंनी वैभववाडी ठाकरे सेना केली गारद ; तीन नगरसेवक भाजपात

नगरसेवक प्रदीप रावराणे, श्रद्धा रावराणे व सुभाष रावराणे यांनी केला प्रवेश

वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीत भाजपा नगरसेवकांची संख्या पोचली १३ वर

युवा तालुकाप्रमुखासह शिवसैनिक भाजपात

वैभववाडी : नरेंद्र कोलते
आमदार नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला वैभववाडीत जोरदार धक्का दिला आहे. उबाठा गटाचे तीन नगरसेवकक व युवा तालुकाप्रमुख केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाले आहेत. प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये प्रदीप रावराणे, नगरसेविका श्रद्धा रावराणे व नगरसेवक सुभाष रावराणे यांचा समावेश आहे. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते. तसेच भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख संताजी रावराणे रोहित रावराणे, आशिष रावराणे, प्रशांत रावराणे आदी उपस्थित होते.

या तीन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीत भाजपा नगरसेवकांची संख्या 13 इतकी झाली आहे. प्रवेश केलेल्या श्रद्धा रावराणे या प्रभाग एक मधून विजयी झाल्या होत्या. तर प्रदीप रावराणे हे प्रभाग सात मधून विजयी झाले होते. प्रभाग 15 मधून सुभाष रावराणे हे विजयी झाले होते. या तिन्ही नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे वैभववाडी भाजपा अधिक मजबूत झाली आहे.