मेष रास
आज आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. प्रत्येक कामात मार्गदर्शन घ्या. हळूहळू पुढे जा. तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तर शोधत आहात ती शांत बसल्यावर तुम्हाला मिळतील. वेळेवर मदत मिळेल. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे लाभदायक राहील.
वृषभ रास
आज बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडतील. तुम्ही जे कष्ट घेतले त्याचे फळ आता तुम्हाला मिळेल. स्वतःसाठी छानसे आज काहीतरी करा. पैशाशी संबंधित कामे होतील. मनामध्ये एक प्रकारचे समाधान अनुभवायला मिळेल.
मिथुन रास
आज छान छान बातम्या कळतील. प्रेम तसेच लग्नाचे प्रपोजल मिळेल. लहान मुलांकडून शिक्षणात प्रगती इत्यादीच्या आनंदीत करणाऱ्या बातम्या कळतील. श्रावण महिन्या निमित्त एखादी नवीन साधना सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करू शकता. दैवी शक्तीची मदत मिळेल.
कर्क रास
आज नवीन सुरुवात करा. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा. नोकरी अथवा व्यवसायाच्या शोधात असाल तर ते आता पूर्ण होईल. थोडी रिस्क घ्यावी लागेल. प्रवास करण्याने लाभ होईल.
सिंह रास
आज मनाप्रमाणे काम होईल. पूर्ण दिवसच कामात जाईल म्हटले तरी चालेल. मनापासून प्रयत्न करा यश मिळेल. नवीन संधी, प्रोजेक्ट, मिळतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल.
कन्या रास
आज आयुष्यात काहीतरी मोठा बदल घडणार आहे. त्यासाठी तयार राहा. हृदयाला दुःख देणारी एखादी बातमी ह्या काळात कळू शकते. जुन्या आठवणी, जुन्या सर्वच गोष्टी सोडून द्या आणि पुनर्जन्म मिळाल्यासारखे काम करा म्हणजे लाभदायक राहील.
तुळ रास
आज बुद्धीचा आणि प्लॅनिंग चा वापर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवून देईल. एखाद्या अशा व्यक्तीशी भेट होण्याचे योग आहेत जिच्या हुशारीमुळे तुम्हाला आयुष्याची दिशा सापडेल. तत्वांना किती मुरड घालायची आणि किती नमते घ्यायचे हे त्यातून मिळणाऱ्या फायद्यावर अवलंबून असेल.
वृश्चिक रास
आज चा दिवस छान जाईल. तुमच्या हक्काच्या गोष्टीची मागणी करा, नक्की मिळेल. उत्तम खरेदी होऊ शकेल. मुलांशी संबंधित काही आनंददायक बातम्या कळतील. रस्त्यावरच्या कुत्र्यांना जर आज काही खायला देता आले तर तुमच्यासाठी लाभदायक राहील. अडचणी कमी होतील. सल्ला घेऊन काम करा. घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.
धनु रास
आज तुम्हाला कोणतेही काम करण्याचा कंटाळा येईल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतून तुम्ही पळवाट शोधाल. कामात शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्या कल्पना आत्ताच कोणासोबत शेअर करू नका. तसेच महत्त्वाची कागदपत्रे अगदी पासवर्ड, पिन्स देखील सांभाळून ठेवा. चोरी होण्याची शक्यता आहे.
मकर रास
आज अकारण चिंतेत तुमचा वेळ जाईल. मनातल्या गोष्टी वेळेवर बोलण्याची सवय लावून घ्या. असे काही आजच्या दिवसातून करू नका जे पुढे तुम्हाला अडचणीत आणेल. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटत होती ते घडणारच नाही. मारुतीचे दर्शन घ्या सगळे ठीक होईल.
कुंभ रास
आज थोडे सांभाळूनच राहा. एखादी अशी अडचण अचानक येऊ शकते जिथे पैसे लागतील. वेळ आणि पैसा दोन्हीची तयारी ठेवा. तुमच्या ज्या गोष्टींवर, ज्या व्यक्तींवर विश्वास होता, त्यामध्ये अश्या काही घटना घडतील की तुमचा विश्वास उडेल. डोकेदुखी तसेच इतर त्रास होऊ शकतात. आजचा दिवस सावध राहून काळजी घेत घालवा.
मीन रास
आज नशिबावर विश्वास ठेवा. तुमच्या हातात आहे तेवढे सगळे प्रयत्न करा. तुम्हाला अपेक्षित काम होईल. पैशाशी संबंधित कामे होतील. दिलेले पैसे परत मिळावे म्हणून प्रयत्न करा.
@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
++++++++++++++++++++++++++++++