लांजा Update : अखेर जि प शिक्षण अधिकाऱ्यांचा निर्णय मागे

Google search engine
Google search engine

 

 

 शिक्षकांनी मानले प्रहार डिजिटल चे आभार 

 

 संतोष कोत्रे 

      लांजा-: सकाळ सत्रात मोजक्याच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ध्वजारोहण करण्याचा निर्णय अखेर शिक्षणाधिकारी यांनी मागे घेतला असून हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाळेच्या नियमित वेळेत म्हणजे साडेदहाच्या वेळेस करावा असे असे सुधारित आदेश शिक्षणाधिकारी दिले आहेत .

हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत काही मोजक्याच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन दिनांक 13 आणि 14 रोजी सकाळ सत्रात ध्वजारोहण करण्याचा फतवा शिक्षण अधिकारी यांनी काढला होता. याबाबतचे तोंडी आदेश शिक्षकांना प्राप्त झाले होते. त्यामुळे संपूर्ण जिल्हाभरातील शिक्षक वर्ग आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्यातून आश्चर्य व्यक्त केले जात होते. या पार्श्वभूमीवर डिजिटल प्रहाने सडेतोड वृत्त प्रसिद्ध करून यावर प्रकाशझोत टाकला होता .

दैनिक प्रहार डिजिटल च्या या वृत्ताची दखल घेत अखेर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी सकाळ सत्रात ध्वजारोहण करण्याचा आपला निर्णय मागे येतला असून शाळेच्या नियमित वेळेमध्येच म्हणजे साडेदहाच्या सुमारास शाळा भरल्यानंतरच ध्वजारोहण करण्यात यावा असे सुधारित आदेश पुन्हा एकदा शिक्षण अधिकारी यांनी शिक्षकांना दिले आहेत याबद्दल शिक्षकांनी प्रहार डिजिटलचे आभार मानले आहेत