‘Mission Jeevan’ activity in Sawantwadi by Mission Aadhaar
उन्हाळ्यामुळे तहानलेल्या पशू पक्षांसाठी उपलब्ध केले पाणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : उन्हाळा वाढल्याने सर्वांच्याच अंगाची लाहीलाही होत असताना उन्हाळ्यात पक्षी व प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मिशन आधार तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवण्यात येत असलेले ‘मिशन जीवन ‘ आज सावंतवाडी मध्ये राबवण्यात आले. सावंतवाडी शहरातील शिव उद्यान येथे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकिय अधीक्षक डॉ. दुर्भाटकर यांच्या शुभहस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मळगाव घाट, शिल्पग्राम रोड, सावंतवाडी फिश मार्केट आणि पाटबंधारे विभाग चराठा कॉलनी या ठिकाणी पाण्याची भांडी ठेवण्यात आली.
यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, माजी शिक्षक श्री. नाडकर्णी सर, सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी गजानन परब, पाटबंधारे विभाग कर्मचारी संदीप राणे व इतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी ॲड. परिमल नाईक यांनी या मिशन आधारला शुभेच्छा दिल्या तसेच मिशन जीवन या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. उन्हाळ्यात पशुपक्षी तहानेने व्याकुळ झालेले असतात अशावेळी त्यांची तहान भागवण्यासाठी हाती घेतलेले हे मिशन जीवन खरोखरच त्यांना नवजीवन देणारे आहे अशा शब्दात परिमल नाईक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी मिशन आधारचे उपाध्यक्ष आनंद पुनाळेकर, प्रसाद नाडकर्णी, वैभव घाग, ऋषिकेश खानोलकर, वामन सावंत, तुषार रेमुळकर, ओमकार शिरोडकर, सोनाप्पा गवळी असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.