मंडणगड : प्रतिनिधी l मंडणगड तालुक्यातील तिडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला गुंज सामाजिक संस्था, दिल्ली यांच्या वतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली. साहित्यात पर्यावरणपूरक कापडी स्कूल बॅग, स्टेशनरी, आरोग्य विषयक साहित्य देण्यात आले आहेत.शाळेत नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात या साहित्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. याचबरोबर अंगणवाडीतील मुलांना खेळणी तसेच माइंड गेम खेळणी देण्यात आली .
यावेळी गुंज संस्थेच्या माध्यमातून शालेय उपक्रमासोबत संस्थेचे सदस्य यांनी वाडीतील ग्रामस्थांसमवेत तिडे आदिवासी वाडी परिसरात स्वच्छता केली. संस्थेमार्फत सहभागी ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे कीटची भेट देण्यात आले.
यावेळी गुंज संस्थेचे सदस्य श्री. दुर्गवले, श्री.नाटूस्कर यांनी उपस्थितांना पर्यावरण, स्वच्छता व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला वाडीतील संपूर्ण महिला,पुरुष तसेच नवयुवक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका वर्षा जाधव, अंगणवाडी सेविका स्वप्नाली जाधव, मदतनीस सौ.यादव यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक निलेश लोखंडे यांनी केले.