मध्य रेल्वेने कोकणवासियांची केवळ ७४ गाड्यांवर बोळवण केली

The Central Railway has called Konkanis on only 74 trains

मुंबई : ऊन्हाळ्याच्या मुंबई पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून जवळपास ४५० हून अधिक विशेष गाड्या चालवण्यात असून त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक गाड्या केवळ उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिणेकडील. राज्यातील प्रवाशांसाठी चालवल्या जात आहेत, तर कोकणवासियांची केवळ ७४ गाड्यांवर बोळवण केली जात आहे. त्यामुळे त्यांची कन्फर्म तिकीट मिळवताना मोठी दमछाक होत आहे. यावरून मध्य रेल्वेने यंदाही कोकणवासीयांना डावल्याचे दिसत आहे
कोकणातील चाकरमानी नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे वास्तव्याला आहेत. ऊन्हाळी सुट्टीनिमित्त ते आपल्या कुटुंबियासह गावाची वाट धरतात त्यासाठी रेल्वे प्रवास किफायतशीर आणि सुरक्षित आहे. त्यामुळे चाकरमाने जास्त करून कोकण रेल्वेला प्राधान्य देतात मात्र मर्यादित गाड्या सोडून मध्य रेल्वे कोकण वासियांवर अन्याय केला आहे