वैभववाडीत उद्यापासून मोफत योग प्राणायाम व ध्यान शिबिर

Free yoga pranayama and meditation camp at Vaibhavwadi from tomorrow

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : माजी सभापती जयेंद्र रावराणे यांचे आवाहन

वैभववाडी | प्रतिनिधी :  माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे व पतंजली योग समिती शाखा वैभववाडी यांच्या वतीने बुधवार दिनांक २६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान अर्जुन रावराणे विदयालय पटांगण वैभववाडी , पाच दिवसीय भव्य मोफत योग,  प्राणायाम व ध्यान  शिबिर आयोजित केले आहे. या शिबीरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला पतंजली योग समिती पश्चिम महाराष्ट्र राज्य कार्यकारणी  सदस्या रमाताई जोग मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहीती माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी दिली आहे.
अ.रा.विदयालय वैभववाडी येथे आयोजित पञकार परिषदेत रावराणे बोलत होते. यावेळी महिला पतंजली योग समिती वैभववाडी अध्यक्षा मानसी सावंत, महामंञी विदया पाटील, संघटकमंञी श्रावणी रावराणे, रुपाली रावराणे, स्वराली कोलते, मुख्याध्यापक नादकर आदी उपस्थित होते.
या शिबिराचे उद्घाटन बुधवारी २६ एप्रिल रोजी सायंकाळी ठिक ५.३० वा. अ.रा.विदयालय वैभववाडी येथे होणार असून यावेळी तहसिलदार श्रीमती देसाई, पोलिस निरीक्षक अमित यादव, योग शिक्षक प्रणव जोग, रमेश कवडे तर महिला पतंजली उत्तर सिंधुदुर्ग अध्यक्षा दिपश्री खाडीलकर, महामंञी रश्मी आंगणे संवाद व संपर्क प्रिया कोचरेकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य समाज गौरव पुरस्कार प्राप्त समाजसेवक सुनिल नारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
या शिबीरात दिनांक २६ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान दररोज पहाटे  ५ ते ७ वा.पहिले सञ महिला व पुरुषांसाठी जनरल तर दुसरे सञ सकाळी ७ ते ८.३० विदयार्थ्यांसाठी तसेच तिसरे सञ सायंकाळी ६ ते ७ वाजता जनरल सञ होणार आहे.
तरी या मोफत योग, प्राणायाम व ध्यान शिबीराचा लाभ सर्वांनी घ्यावा. असे आवाहन पतंजली योग समिती शाखा वैभववाडी यांच्यावतीने जयेंद्र रावराणे यांनी केले आहे.