गुहागर | प्रतिनिधी : मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती
प्रतिष्ठानच्या गुहागर तालुक्यातील मुंढर येथील श्री सिध्दीविनायक
मंदिरमध्ये व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच झाले. उद्घाटन डाँ. विवेक नातू यांच्याहस्ते झाले. यावेळी मार्गदर्शक म्हणून सुरेंद्र
वैद्य, सचिन विचारे संतोष अरमारे यांनी मार्गदर्शन केले.
एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळी सुट्टी असते. त्यामुळे दहावी परीक्षा
दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी 24 एप्रिल ते 28 एप्रिलपर्यंत कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आल्याची माहिती मार्गदर्शकांनी दिली. आमच्याकडे अशी एक बँच आहे त्यातील 40 विद्यार्थ्यांना प्लंबिंग, वेल्डिंग, इलेक्ट्रीशियन, सुतारकाम, फिटींग, स्प्रे पेंटिंग आदी शिकण्याची संधी संस्थेने उपलब्ध केली आहे. या आठवड्यात ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले आहे त्यांच्या कामाचे मूल्यमापन करुन सहभागाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला चंद्रकांत चांदोरकर, विवेक भिडे, देवखेरकी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत साळवी, मंगेश गोरिवले, शंकर गलांडे, गणेश कुलकर्णी, विजय वेले, सुनिता गोखले, संदीप शिर्के, चंदन
वसावे, दिलीप बडद, शंकर घाणेकर, विनोद सुर्वे, प्रसाद वैशंपायन, श्रीमती
अश्विनी शिर्के आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पराग कदम यांनी केले. आभार अनंत साठे यांनी मानले.