मीरा कोलकांडचे चित्र व माहिती विशेष आकर्षण
पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात इंग्रजी भाषा दिन कार्यक्रम मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांच्या अध्यक्षतेत नुकताच साजरा करण्यात आला. सदर इंग्रजी भाषा दिन कार्यक्रमानिमित्त विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेमधून कविता , विविध विषयांवरील माहिती , इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध कवी व नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्याबद्दल माहिती सादर केली .विद्यालयातील कु. मीरा कोलकांड हिने विल्यम शेक्सपियर यांचे रेखाटलेले चित्र व सादर केलेली माहिती कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरली.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक , कवी , नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या जन्मदिनानिमित्त इंग्रजी भाषा दिन कार्यक्रम मुख्याध्यापक एम.ए.थरकार यांच्या अध्यक्षतेत साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला मान्यवर म्हणून सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी श्री.एस.वाय भिडे , श्री.एस.एम. आंबेकर , इंग्रजी विषय शिक्षिका सौ.एन.पी.वैद्य उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाध्यक्ष व मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार व उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.एम.ए.थरकार यांच्या हस्ते इंग्रजी साहित्यिक , कवी , नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते नववीमधील कु. भक्ती दीक्षित , पुनम मोहिते, पूर्वा माळी , शमिका भिडे , सार्थक मेस्त्री , मृण्मयी जाधव , मीरा कोलकांड या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेमधून कविता , विविध विषयांवरील माहिती , इंग्रजी भाषा दिनाचे महत्त्व , इंग्रजी भाषा विषयक साहित्यिक , कवी , नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जीवन परिचय या विषयांबाबत माहिती सादर केली. इयत्ता नववीमधील विद्यार्थिनी कु. मीरा कोलकांड हिने इंग्रजी भाषा साहित्यिक विल्यम शेक्सपियर यांचे रेखाटलेले चित्र व लिहिलेली माहिती सदर कार्यक्रमात विशेष आकर्षक ठरली.
सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विषय शिक्षिका सौ.एन.पी.वैद्य यांनी केले होते. कार्यक्रमाध्यक्ष व मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांनी इंग्रजी भाषा दिन कार्यक्रमात सहभागी झालेल्या व इंग्रजी मधून सादर केलेल्या माहितीबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. इंग्रजी भाषा दिन व इंग्रजी भाषेचे महत्व याबाबत श्री थरकार यांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी विषय शिक्षिका सौ.एन.पी.वैद्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून मान्यवर मुख्याध्यापक , शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्याबद्दल आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.