तिलारी कुडासे भोमवाडीत कालवा फुटला!!

शेतकरी याचें नुकसान

रस्त्यावर पाणीच पाणी

ताडपत्री चोरल्याने भगदाड पडले

दोडामार्ग | सुहास देसाई : तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या डावा कालवा कुडासे धनगर वाडी
नजीक पूर्ण क्षमेतेने वाहणारा कालवा अचानक फुटला असल्याने कुडासे येथील रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने हाकत आहे तर आजूबाजूच्या परिसरातील शेती बागायती पाणी घुसुन नुकसानी झाली आहे याकडे शिवसेना उप तालुका प्रमुख बाबाजी देसाई यांनी जल संपदा अधिकारी याचें लक्ष वेधले आहे व तात्काळ पाणी पुरवठा बंद करावा व शेतकरी याचें नुकसान झाले आहे त्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे