प्रशासकाची नियुक्ती : पाच संचालकांनी कर्ज परतफेड मुदतीत न केल्याने कारवाई
वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली विकास सोसायटी मधील पाच संचालकांनी कर्ज परतफेड मुदतीत न केल्याने सोसायटीला यावर्षी खरीप शेती पीक कर्ज उचल मुदतीत करता आलेली नाही. परिणामी सहकार कार्यालया कडून दाभोली संस्थेतील थकीत पाच संचालकाना संचालक मंडळातून अपात्र करण्यात आले. संस्थेमध्ये एकुण संचालक संख्या 13 पैकी 2/3 संचालक असणे आवश्यक असते मात्र संस्थेने भरलेल्या 11 संचालकापैकी 05 संचालक अपात्र ठरल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले . परीणामी संचालक मंडळ बरखास्त् होवुन संस्थेवर प्रशासक नियुक्तीची प्रसंग ओढावुन आला.
गावातील विकास संस्था ही शेतीसाठी लागणारे खत, अवजारे, भात बियाणे, भाताची विक्री, शेती कर्ज,शेती पूरक गरजा भागविणेसाठी असते . मात्र खरीप शेती हंगाम संपत अला तरी संस्थे मार्फत कर्ज वाटप नझालेने शेतकरी सभासद शेती पीक कर्जा पासून वंचित राहिले आहेत. दाभोली या सोसायटीमध्ये ४३८ एवढे गावातील शेतकरी सभासद आहेत.
थकीत 05 संचालकांना बँक व सहकार कार्यालयाने वारंवार कळऊनही त्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे ते संचालक अपात्र ठरले. परीणामी दाभोली सोसायटीचे संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त झाले.
आता या सोसायटीचा कारभार जिल्हा बँकेचे अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. जोपर्यंत या सोसायटीची निवडणूक प्रक्रीय पुर्ण होणार नाही. तोपर्यंत सोसायटीचा कारभार प्रशासक यांच्याकडेच राहणार आहे.











