नवनियुक्त प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

Newly appointed District Magistrate Jagdish Katkar met MLA Nitesh Rane

कणकवली : नव्याने नियुक्त झालेल्या कणकवली चे प्रांताधिकारी जगदिश कातकर यांनी आज बुधवार २६ एप्रिल रोजी आमदार नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जगदीश काटकर हे नायब तहसीलदार, तहसीलदार अशा पदांवर काम करून प्रांताधिकारी पदापर्यंत पोहोचलेले आहेत. कणकवली, देवगड, वैभववाडी या तालुक्यात यापूर्वी त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे येथील परिस्थितीचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे प्रशासकीय काम करणे अधिकच सोपे होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत कणकवली तहसीलदार आर.जे. पवार उपस्थित होते.