खेडमध्ये पूर परिस्थितीत मदत करणाऱ्यांचा सत्कार

खेड (प्रतिनिधी)  येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण कार्यक्रमानंतर खेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मदत कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचा प्रातिनिधिक सत्कार आ. योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
खेड शहरात . १४ जुलै रोजी पूर परिस्थिती उद्भवल्यानंतर शोध, बचाव कार्य, फूड पाकीट व जीवनावश्यक वस्तू पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचवणे आदी कामात योगदान देणाऱ्या नागरिकांचा प्रातिनिधिक सत्कार स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात . १५ रोजी आ. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.
यावेळी सर्फराज पोत्रिक, खालील जुईकर, बिलाल जुईकर, खळफान मणियार, बुऱ्हाण टांके, सलमान पोत्रिक, अंकुश शिंदे, साहिल बुटाला, साईराज साळवी यांच्या सह अनेकांचा समावेश होता.