Extension Evaluation Program of University of Mumbai completed at Gavankar College
सावंतवाडी । प्रतिनिधी : आजीवन अध्ययन विस्तार विभाग मुंबई विद्यापीठ यांच्यातर्फे आज देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयांमध्ये विस्तार मूल्यमापन कार्यक्रम पार पडला यावेळी विभागाचे संचालक डॉ. श्री कुणाल जी जाधव सर त्याचबरोबर विभागाचे प्रा. डॉ. सचिन राऊत श्री किरण पाटील श्री संतोष पाटील क्षेत्र समन्वयक श्री उमेश परब सर व महेंद्र ठाकूर सर उपस्थित होते सिंधुदुर्गातील १४ महाविद्यालय विस्तार मूल्यमापनासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य यशोधन गवस यांनी केले अध्यक्ष भाषण करताना डॉक्टर जाधव सर म्हणाले की सिंधुदुर्गामध्ये टुरिझम मॅनेजमेंट ला भरपूर वाव आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी टुरिझम याबद्दलचा अभ्यास करावा आणि त्यामुळे आपला विकास करता करता जिल्ह्याचा विकास होईल तसेच महाविद्यालयातील उपस्थित विस्तार कार्यशिक्षक यांना मार्गदर्शन केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी स्वराली पेडणेकर हिने केले यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री पाटील सर साईप्रसाद पंडित सौ.अस्मिता गवस आनंद नाईक मेधा मयेकर उपस्थित होते…