Saraswat Snehvardhak Mandal organized a special seminar for entrepreneurs on 29th
रत्नागिरी : सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, रत्नागिरीद्वारा ग्लोबल चेंबर फॉर सारस्वत आंतरप्रुनर्स यांच्या सहकार्याने ‘एमएसएमई – क्षमता आणि आगामी संधी’ या विषयावर मराठी मध्ये सेमिनार शनिवार दि. २९ एप्रिल २०२३ रोजी संध्या. ५ ते ७ या वेळेत हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटीव्ह, मारुती मंदीर, रत्नागिरी येथे आयोजित केला आहे. यावेळी व्यक्ते म्हणून श्री मंगिरिष पै रायकर आहेत. ते आर सी पी आर कृषी महाविद्यालय , सवोई वेरेम , गोवा, अध्यक्ष असून आणि ब्राऊन पॅकेजिंग सिस्टिम्स प्रायवेट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. श्री मंगिरिष पै रायकर हे एमएसएमई नॅशनल कौन्सिल चे अध्यक्ष, असोचम चे सदस्य, भारत सरकारच्या एमएसएमई राष्ट्रीय मंडळाचे सदस्य आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एमएसएमई सबलीकरण समितीचे सदस्य आहेत.
एमएसएमई समोरील आव्हाने आणि यातून योग्य तर्हेने बदल घडवून मार्ग काढणे तसेच सुरूवातीला व्यवसाय कसा सुरू करायचं , प्रारंभीक आव्हाने, अडचणीवर मात करणे, व्यवसाय सुरू करण्यात असलेले महत्वाचे स्वरूप, यशस्वी प्रकल्पाची महत्वाची पावले आणि नवउद्यमी यशोगाथा इत्यादी विषयांवर भाष्य करणार आहेत.
सदर सेमिनारमध्ये उद्योजकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.