पुर्ये तर्फे देवळे येथे गंजलेल्या विदयुत खांबा मुळे दुर्घटनेची भीती

Fear of accident due to rusted electric pole at Deole by Purye

साखरपा | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे पांगळे वाडीजवळ विजेचा खांब खालून पूर्ण गंजला असून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून महावितरण कपंनी कडे दोन वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा येथील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत गावामध्ये अनेक पोल गंजले आहेत.थोडयाच दिवसात शेतीची कामे सुरु होणार असून हा पोल शेतीच्या मध्य भागी आहे. आजूबाजूला शेतकरी काम करीत असतात तेव्हा पोल कदाचित मोडला तर दुर्घटना होऊ शकते आणि यास सर्वस्वी जबाबदार कोण?
हा पोल लवकर बदलावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.