Cooperate in providing information by industries under Annual Industry Survey -Vijay Aher, Director, Directorate of Finance and Statistics
रत्नागिरी : वार्षिक उद्योग पाहणी अंतर्गत उद्योगांनी माहिती देण्यासाठी सहकार्य करुन देशाच्या व राज्याच्या उद्योग क्षेत्राच्या वाढीच्या मोजमापात योगदान द्यावे, असे आवाहन, मुंबई यांनी केले आहे.वाउपाच्या क्षेत्रकामातून संकलित करण्यात येणाऱ्या माहितीची गुणवत्ता वाढविण्यासाठी व क्षेत्रकामाचा दर्जा उंचाविण्याच्या दृष्टीकोनातून सन २०२१-२२ या वर्षाच्या क्षेत्रकामासाठी राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा दि. १९ ते २१ एप्रिल, २०२३ या कालावधीत नियोजन विभागाच्या अधिनस्त अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई तर्फे यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महासंचालक, यशदा एस. चोकलिंगम, (भा.प्र.से.) व प्रमुख पाहूणे म्हणून सौम्या चक्रवर्ती, उपमहानिदेशक, औद्योगिक सांख्यिकी विभाग, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोलकाता, राष्ट्रीय नमूना पाहणी विभागाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोककुमार, उद्योग विभागाचे प्रतिनिधी पी.डी. रेंदाळकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे आणि विजय आहेर, संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई हे व्यासपीठावर उपस्थित होते.
संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय कोकण विभागाच्या श्रीमती सिमा जोशी, सहसंचालक व जिल्हा सांख्यिकी कार्यालय रत्नागिरीचे उपसंचालक श्री. निवास यादव आणि राज्यातील प्रादेशिक कार्यालय व जिल्हा सांख्यिकी कार्यालय असे एकूण १६४ अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले. वार्षिक उद्योग पाहणी (Annual Survey of Industries) हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (GDP) तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे
निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते तर राज्यातील उद्योग पाहणीचे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालय या राज्य शासनाच्या सांख्यिकी विषयक नोडल यंत्रणेकडून करण्यात येत असून निवड करण्यात आलेल्या उद्योगांना सांख्यिकी संग्रहण अधिनियम २००८ मधील तरतुदीनुसार माहिती देणे बंधनकारक आहे. तरी वार्षिक उद्योग पाहणी अंतर्गत उद्योगांनी माहिती देण्यासाठी सहकार्य करुन देशाच्या व राज्याच्या उद्योग क्षेत्राच्या वाढीच्या मोजमापात योगदान द्यावे. असे आवाहन विजय आहेर, संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांनी केले.
कार्यशाळेमध्ये रणबीर डे व बाप्पा करमरकर, उपसंचालक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, भारत सरकार कोलकाता, डॉ. प्रदिप आपटे, प्रख्यात अर्थतज्ञ व प्राध्यापक, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्रीनिवास शिर्के आणि महेश चोरघडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. जितेंद्र चौधरी, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे सत्र नियंत्रक व तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.), उपमहानिदेशक, यशदा, पुणे हे अध्यक्ष व पुष्कर भगूरकर, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे प्रमुख पाहुणे म्हणून महानिदेशक, यशदा, पुणे हे अध्यक्ष व पुष्कर भगूरकर, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्रीमती दिपाली धावरे, उपसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना प्रास्ताविक अवगत केले. तसेच श्री. नवेन्दु फिरके, सहसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले.उपस्थित होते.