Not only children but also government employees have many holidays in the month of May
आर्थिक वर्ष 2023-24 चा पहिला महिना संपत आला आहे आणि नवीन महिना काही दिवसात सुरू होईल. अशा स्थितीत मे महिना सुरू होण्यापूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पैशांचे व्यवहार, डिमांड ड्राफ्ट प्राप्त करणे, चेक जमा करणे अशा अनेक कामांसाठी बँकेची आवश्यकता असते. बँकेला सुट्टी असेल तर अनेक वेळा ग्राहकांची महत्त्वाची कामे रखडतात.
तुम्हालाही मे महिन्यात काही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर तुम्हाला बँकेला कधी सुट्टी असते याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.
मे महिन्यात एकूण किती दिवस बँका बंद राहतील?
मे 2023 मध्ये बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. सण, जयंती इत्यादी कारणांमुळे बँकांना एकूण 12 दिवस सुट्टी असेल. त्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.
मे महिन्यात महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, महाराणा प्रताप जयंती असे अनेक महत्त्वाचे दिवस आहेत.