सोनसाखळी चोरट्यांना चिपळूण पोलिसांनी शिताफिने केले जेरबंद

The gold chain thieves were arrested by the Chiplun police

शिरगाव : हेराफेरी करुन चौघानी एका वृध्देची सोन्याची चेन लंपास करण्याची घटना शिरगाव येथे सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर सापळा रचून कुंभार्ली चेकपोस्ट येथे त्या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन अंगठ्यांसह तीन चेन असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मनोहर कासार (६२, शिरगाव) यांनी दिली .
राजेश भागुनाथ मदारी ), भविष्यनाथ जाफरनाथ मदारी ( २८), धारानाथ मदारी जाधवनाथ मदारी (२५),अशी अटक केलेल्यांची नावे आहेत हे चौघेजण एका कारमधून शिरगाव येथे आले होते त्यावेळी रस्त्याने जात असताना त्यांनी कासार यांना थांबून शंकर मंदिर कुठे त्याची माहिती विचारले त्यावेळी त्या चौघांनी कासार यांना जादुगिरी करत त्यांच्याकडे असलेली चैन भागून घेत त्यांच्याशी हेराफेरी करत ही चैन त्यांना न देत असते निघून गेले याबाबत कासारे यांनी लोरे शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घाटमाताला जोडणाऱ्या कुंभारली घाट चेक पोस्टवर सापळा रचून या आरोपींना कार सकट ताब्यात घेतले त्यावेळी तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन चेन व अंगठी असा ऐवज आढळून आला