आजचा दिवस कसा जाईल?*
*24 ऑगस्ट 2024, शनिवार.*
मेष रास
आज तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला न्याय मिळेल. जी लोक तुम्हाला त्रास देत होती किंवा ऑफिस इत्यादी ठिकाणी त्रास होत होता तो कमी होईल. तुमचे म्हणणे मान्य होईल. तुम्ही देखील इतरांना योग्य वागणूक देण्याची गरज आहे.
वृषभ रास
आज दिवस भराभर जाईल. एकाच वेळेस खूप सार्या गोष्टी घडतील. त्यामुळे तुमची धावपळ होईल. चांगल्या घटना घडल्यामुळे आनंद होईल. एखादी काळजी करायला लावणारी घटना देखील घडू शकते.
मिथुन रास
आज मन आणि शरीर दोन्ही उत्तम असतील. आनंद देणाऱ्या घटना घडतील. लग्नासाठी चांगले स्थळ सांगून येईन. प्रेम संबंधांमध्ये मजबूती येईल.
कर्क रास
आज शांततेत काम करा. स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची गरज आहे. एखादा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. आज जास्त वेळ आराम करण्यात जाईल.
सिंह रास
आज इतरांसोबत सहानुभूतीने वागण्याचा प्रयत्न करा. इतरांची दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा. शक्य झाले तर इतरांना मदत करा. एखाद्या संस्थेला देणगी इत्यादीच्या रूपात मदत करा.
कन्या रास
आज अति कामामुळे तुमची दमणूक होईल. जमेल तेवढेच काम आणि जबाबदाऱ्या घ्या. हेल्थ वर परिणाम होईल. स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रयत्न करा.
तुळ रास
आज तुमचा “लकी डे” आहे असे समजा. नशिबाची साथ मिळेल. काही गोष्टींमध्ये, कामांमध्ये अडचणी आल्या होत्या, कामे रखडली होती, तर आता त्यात मार्ग मिळेल. सर्व अडचणीतून सुटका होईल. चांगल्या दिवसाचा लाभ करून घ्या.
वृश्चिक रास
आज पूर्वी शिकलेल्या गोष्टीतून लाभ होईल. तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. अर्थपूर्ण काम तुमच्या हातून घडेल. पैशाशी संबंधित कामे करा.
धनु रास
आज अनेक पर्यायांमधून तुम्हाला योग्य पर्याय निवडावा लागेल. जे गरजेचे नाही ते टाकून द्या. सिरीयस न होता सहजपणे आज वागण्याचा प्रयत्न करा.
मकर रास
आज सुरुवातच काहीशा अडचणीने होऊ शकते. तुम्हाला नवीन कल्पना सुचतील, त्या तुमच्याकडेच ठेवा अन्यथा इतरांनाच त्याचा लाभ होईल.
कुंभ रास
आज थोडा वेळ एकांतात घालवल्यास फायदा होईल. मार्गदर्शन घेऊन काम करा. वयाने तसेच अधिकाराने मोठ्या व्यक्तीकडून मदत मिळेल.
मीन रास
आज पुढे जात रहा. प्रवासात लाभ होतील. आज मंदिरात जाऊन दर्शन घ्या. मन:शांती मिळेल. थोडा वेळ चालू कामातून वेळ काढा. छोटासा फेरफटका मारून या त्यामुळे बरे वाटेल.
@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
++++++++++++++++++++++++++++