खेड(प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत येथील क्रीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील लायन्स
एज्युकेशन सोसायटी संचलित एलटीटी इंग्लिश मिडियम स्कूलमधील खेळाडूंनी १६ सुवर्णपदक ९ रौप्य व १ कांस्य अशा २६ पदकांची कमाई केली. खेळाडूंची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गायत्री तांबे, फलक तिसेकर, श्रेया नलावडे, रूद्रा भोसले, हेमांगी कदम, आर्या सुतार, तेजस्वी कदम, श्रावणी सालेकर, फातिमा देशमुख यांनी सुवर्णपदक मिळवले. मुलांच्या गटातून पृथ्वी शिर्के, झाहिद लोखंडे, ऋतुराज जोगळे, पार्थ कदम, आराध्य पवार, फाज बरमारे, दीपक ढेबे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. रिया तांबट, ईश्वरी तांबे, गार्गी घाडगे, सफा दुदुके, सारा जसनाईक, तृप्ती पाटील, श्रावणी खेडेकर, हारून सिद्दिकी, इबाद मुकादम यांनी रौप्यपदक तर नैतिक भोईत याला कांस्यपदक मिळाले.
खेळाडूंना क्रीडाशिक्षक सुशांत पाटील, अमर जड्याळ, पांडुरंग विटमल यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थाध्यक्ष अहमद मुकादम यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्था सदस्य वाहिद मुकादम, जयेश गुहागरकर, माजिद खतीब, प्रेमल चिखले, चंद्रकिरण वैद्य, डॉ. पुष्कर नेने, विलीन पाटणे, समन्वयक, सेबास्टियन जॉय, मुख्याध्यापक जी. बी. सारंग, प्राथमिकच्या समन्वयिका एल्सी जॉय,
मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर, सीबीएसई प्राथमिकच्या प्रभारी मुख्याध्यापिका सिद्धी वंडकर आदी उपस्थित होते.