जावळे ग्रामपंचायतीचे सरपंचपदी महेंद्र रटाटे यांची निवड

Selection of Sarpanchpadi Mahendra Ratate of Javale Gram Panchayat

मंडणगड | प्रतिनिधी : जावळे ग्रामपंचायतीचे सरपंचपदी यांची ग्रामपंचायत सदस्य महेंद्र रटाटे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीसाठी 26 एप्रिल 2023 रोजी निवडणुक निर्णय अधिकारी श्री. प्रकाश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक प्रक्रीया राबवण्यात आली होती. ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच शंकर खेराडे यांनी अडीच वर्षांचा कालावधी पुर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदाची निवडणुक प्रक्रीया राबवण्यात आली होती ही प्रक्रीया पुर्ण केल्यावर महेंद्र रटाटे यांची निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. निवडीचे कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, भाई पोस्टुरे, नगरसेवक सुभाष सापटे, माजी सरपंच अनिल रटाटे, पाडुरंग भानशे, शंकर खेराडे, यशवंत चोरगे, वैभव भानशे, संतोष रटाटे, रामचंद्र रटाटे, अनंत रटाटे, राजाभाऊ भानशे, शंकर होडबे, सुभाष शिगवण, रघुनाथ भानशे, भागोजी चोरगे, आदीनाथ चोरगे, भागोजी चोरगे, मनोहर पवार, भालचंद्र रटाटे, ग्रामसेवक डी.एस. सोनावणे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीबद्ल महेंद्र रटाटे यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.