सचिन कारेकर यांचा आबलोली सोनारआळीच्यावतीने सत्कार

Sachin Karekar felicitated by Abloli Sonar Ali

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेतकरी म्हणून विविध स्तरातून कौतुक

गुहागर | प्रतिनिधी : आबलोलीचे प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर यांनी संशोधीत केलेल्या SK-4 हळदीला मोठी ओळख मिळाली आहे.त्यांच्या या संशोधनाला नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यामुळे गुहागर तालुक्यासह आबलोली गावाचे नावदेखील मोठे झाले आहे.याच अनुषंगाने आबलोली सोनारआळी यांच्यावतीने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला.गेली २० वर्षे राबून आणि सातत्य राखून आबलोली येथील प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर यांना राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार त्यांनी संशोधीत केलेल्या SK-4 (स्पेशल कोकण -४) या हळदीच्या प्रजातीबद्दल राष्ट्रपती भवन येथे देण्यात आला. सचिन कारेकर हे आबलोली गावात प्रयोगशील शेतकरी म्हणून काम करीत असून ते कृषी पर्यटन केंद्र चालऊन पक्षी निरीक्षण सारखा छंद जोपासून पर्यटनाला चालना देत आहेत. व सर्व व्यवसायात त्यांची पत्नी स्वरुपा कारेकर त्यांना साथ देत आहेत. व त्यांच्या हाताची चव चाखण्यासाठी देखील पर्यटक येत असतात. या पुरस्कारा आधी त्यांना पर्यावरण विकास रत्न पुरस्कार सारखे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.या सत्कारावेळी आबलोली सोनाराळीचे ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.