Integrated Horticulture Development Program announced
जिल्ह्याला 4 कोटी 38 लाखांचा कार्यक्रम मंजूर
रत्नागिरी | प्रतिनिधी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३ २४ साठी रत्नागिरी जिल्हयाला रक्कम रूपये ४३८.१० लाखाचा कार्यक्रम मंजुर करण्यात आला आहे. यामधे विविध बाबींचा समावेश आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारीत रोपवाटीका, क्षेत्रविस्तार, पुष्पोपादन, फळपिके, मसाला पिके, अळिंबी उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, मुनष्यबळ विकास कार्यक्रम, काढणीत्तोर व्यवस्थापन आणि पणन सुविधा इ. विविध बाबींचा समावेश आहे. यामधे या वर्षी प्रामुख्याने मधुमक्षिका पालनासाठी तरतुद करण्यात आली आहे. क्षेत्रविस्तार घटकांतर्गत ड्रगन फ्रुट या Exotic Fruit Crop साठी रक्कम रूपये १.८२ लाख, पुष्पोत्पादनासाठी रूपये ० १६ लाख, मसाला पिकांच्या (हळद, काळीमिरी, मिरची) लागवडीसाठी रूपये ४.०४ लाख, अळंबी उत्पादन प्रकल्पासाठी रूपये ८.०० लाख, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन-आंबा रक्कम रूपये १६.०० लाख, सामुहीक शेततळ्यासाठी रक्कम रूपये १३.६७ लाख, शेततळे अस्तरीकरणासाठी रक्कम रूपये ४.५० लाख, नियंत्रित शेती – हरीतगृह, शेडनेटगृह, प्लॅस्टिक मल्चींग साठी एकूण रक्कम रूपये ११.२० लाख, मधुमक्षिका पालनासाठी रक्कम रूपये ०.९५ लाख, फलोत्पादन यांत्रिकीकरणासाठी रक्कम रूपये ५१.५० लाख एवढी तरतुद असुन यामधे ट्रक्टर, पॉवर टिलर, पिक संरक्षण उपकरणांचा समावेश आहे. शेतकरी प्रशिक्षण शेतकरी प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण. यासाठी रक्कम रूपये १०.०० लाख रत्नागिरी जिल्हयाच्या दृष्टीने महत्वाची व सर्वाधिक मागणी असलेल्या पॅक हाऊस, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र इ. घटकांसाठी रूपये २९६.४० लाख इतकी भरीव तरतुद करण्यात आली आहे. फिरते विक्री केंद्रासाठी रक्कम रूपये ०.७५ लाख अशी एकुण रक्कम रूपये ४३८.१० लाख तरतुद रत्नागिरी जिल्हयासाठी मंजुर करण्यात आलेली आहे.
या योजनेमधे सहभागी घेण्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी आज्ञावलीवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या नजिकच्या आपले सरकार ई-सेवा केंद्रामधे जाऊन किंवा https://mahadbtmahait.gov.in या आज्ञावलीवर देखील अर्ज करता येऊ शकेल. जिल्हयातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी फलोत्पादनाशी निगडीत योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी किंवा जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रत्नागिरी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहान करण्यात येत आहे