मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी येथील प्रसिद्ध पखवाज वादक व सामाजिक कार्यकर्ते श्री महेन्द्र शिवराम उर्फ बाळा बोरकर (६४ वर्षे) यांचे अंधेरी मुंबई येथे निधन झाले. मुणगे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांना गवंडी कामाची सुद्धा आवड होती. भजनाच्या माध्यमातून अनेक भजनी बुवांना त्यांनी पखवाज साथ केली होती. क्रिकेट, हॉलीबॉल या खेळाची विशेष आवड होती. वाडीतील धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, मुलगा, पुतणे, पुतण्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ह. भ. प. मंगेश उर्फ राजू बोरकर यांचे वडील तर युवा भजनी बुवा अक्षय बोरकर यांचे काका होत.