यशस्वी उद्योजकांना आणखी 15 लाखाची योजना करू व कर्जाचा व्याज परतावा सात दिवसात देऊ!

आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील.

घरात बसणारा मुख्यमंत्री बघितला! तर मराठा समाजासाठी राज्यभर फिरणारे नेतृत्व नरेंद्र पाटील! – आमदार नितेश राणे.

सिंधुनगरी | बाळ खडपकर : मराठा समाजाला सक्षम करण्यासाठी क्रांती मोर्चाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यभर दौरे करत मराठा समाजाला संघटित केले व आरक्षण ही दिले! ते रद्द झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करून मराठा समाजातील तरुण-तरुणी उद्योजकांना उद्योग संधीच दालन उपलब्ध करून दिलं. या मंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून चांगले काम झाले. दहा लाखापर्यंत चे कर्ज घेऊन ज्या मराठा समाजातील उद्योजकांनी यशस्वी उद्योग केले व बँकेची परतफेड केली त्यांना पंधरा लाखापर्यंतचे कर्ज देणारी या महामंडळाची योजना लवकरच जाहीर करू अशी ग्वाही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.

आमदार नितेश यांच्या निमंत्रणावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर होते. व त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेने आयोजित केलेल्या लाभार्थी संवाद व आढावा बैठक यात मार्गदर्शन केले. लाभार्थ्यांची संवादही साधला. यावेळी जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर बँकेचे संचालक उपस्थित होते.राष्ट्रीयकृत बँका या महामंडळाचे प्रस्ताव करण्यास दिरंगाई करतात व आमच्या तरुणांवर अन्याय होतो त्यातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने खूप चांगले काम केले आहे त्यामुळे या बँकेचे मनापासून कौतुक करतो. या आर्थिक वर्षात या बँकेने मराठा उद्योजकांचे 138 प्रस्ताव करून साडेसहा कोटीच्या वर कर्ज वितरण केले आहे ही मराठा समाजासाठी गौरास्पद बाब आहे.

जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे बँकेच्या संचालक सौ नीताताई राणे, सौ प्रज्ञा ढवण, समीर सावंत, गजानन गावडे, रवी मडगावकर, महेश सारंग अशोक सावंत, दादा साईल, प्रभाकर सावंत, यांच्यासह अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी कर्जदार उपस्थित होते.राष्ट्रीयकृत बॅकांमधून महामंडळाच्या योजनेतर्गत कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. मंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून चांगले काम झाले. दहा लाखापर्यंत चे कर्ज घेऊन ज्या मराठा समाजातील उद्योजकांनी यशस्वी उद्योग केले व बँकेची परतफेड केली त्यांना पंधरा लाखापर्यंतचे कर्ज देणारी या महामंडळाची योजना लवकरच जाहीर करू अशी ग्वाही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणावर मराठा समाज असून देखील या जिल्ह्यातून कमी प्रस्ताव का येतात असा प्रश्न उपस्थित करून नरेंद्र पाटील म्हणाले की मराठा समाजाला आर्थिक विकासावर आरक्षण मिळावे ही अण्णासाहेबांची इच्छा होती.म्हणूनच भविष्यात मराठा समाजाला प्रवाहात आणण्यासाठी काय काम करता येईल यासाठी प्रयत्न केले गेले. या महामंडळाचे उद्गाते विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मराठा समाजाला प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा समाजाला जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यकर्त्यांनी सामाजिक चळवळीत काम करताना राजकीय जोडे बाहेर ठेवून काम करावे हे फडणवीस साहेबांचं म्हणणं होतं.तसेच राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला या प्रवाहात आणण्यासाठी खूप मोठं काम झालेलं आहे.या सगळ्यांचा विचार करून पुढील काळात लाभार्थ्यांना व्याज परतावा सात दिवसात होईल याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अगोदर वेळेत परतावा केलेला आहे त्यांना पंधरा लाख योजनेचा लाभ देण्यासाठी देखील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
व्यवसाय वाढीसाठी मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे हे आवश्यक असताना राष्ट्रीय राष्ट्रीयकृत बँका मात्र या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी खूपच दिरंगाई करतात याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

घरात बसणारा मुख्यमंत्री बघितला! तर मराठा समाजासाठी राज्यभर फिरणारे नेतृत्व नरेंद्र पाटील!
आमदार नितेश राणे

आमदार नितेश राणे म्हणाले की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या या दौऱ्यामुळे सिंधुदुर्गातील तरुणांच्या आयुष्यात एक परिवर्तन निश्चितच होईल. या योजनेतील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. आपण घरी बसून काम करणारा मुख्यमंत्री बघितला आणि काम व्हावं म्हणून सर्वत्र फिरणारे नरेंद्र पाटीलही बघितले त्यामुळे भविष्यात निश्चितच मराठा तरुणांना संधी मिळेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे मात्र येथे प्रस्ताव फार कमी प्रमाणात येतात. ते भविष्यात वाढले पाहिजेत असेही नितेश राणे म्हणाले. आदरणीय नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजासाठी केलेले काम गौरवास्पद असून त्यांच्या दौऱ्यामुळे या जिल्ह्यात मराठा समाजामध्ये परिवर्तन होईल या दौऱ्यामुळे या जिल्ह्यात आपल्या तरुणांचे उद्योग व्यवसाय उभे राहतील असे अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मराठा समाजासाठी या योजनेतून चांगले काम करेल:
अध्यक्ष मनीष दळवी
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळा मार्फत जिल्हा बँकेने मराठ्या तरुणातील उद्योजकांना घडविण्यासाठी प्रामाणिक काम केले आहे. केवळ एका वर्षात पावणेसात कोटीचे कर्ज वितरण या जिल्ह्यात मराठा उद्योजकांना झाले आहे. या महामंडळाची ही योजना जिल्ह्यातील तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम या बँकेने केले आहे असेही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

योजनेतील काही त्रुटी दूर व्हाव्यात
उपाध्यक्ष अतुल काळशेकर

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी राज्य शासन केंद्र शासन मराठा समाजाच्या उन्नतीसाठी काम करत असून या महामंडळाची कर्ज योजना या समाजासाठी लाभदायक ठरली आहे. यात काही त्रुटी असून त्या दूर व्हाव्यात अशी मागणी ही त्यांनी केली.

यावेळी या योजनेचा लाभ घेतलेल्या अजित जामदार या टिशू पेपर बनविणाऱ्या तरुणाने जिल्हा बँकेने केलेल्या सहकार्याबद्दल व मार्गदर्शनाबद्दल कोतुक केले.रुक्मिणी परब माडखोल, शंकर परब,अभिषेक राउळ,पल्लवी परब, श्री.काकतकर, सुरेश नाईक या तरुणांनी आपले अनुभव सांगितले व या योजनेअंतर्गत जिल्हा बँकेने आपल्याला कर्ज पुरवठा केला म्हणून जिल्हा बँकेचे आभार मानले.