भाजप -शिवसेना युतीनेच सर्व निवडणुका लढवू!

सावंतवाडीची दीपक केसरकर कणकवलीची नितेश राणे आमदारकी लढवतील!

मुख्यमंत्री असताना बरसु प्रकल्प हवा होता व मुख्यमंत्री पदावरून उतरल्यानंतर प्रकल्प नको झाला ही उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी!

राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांचे टीकास्त्र 

सिंधुनगरी प्रतिनिधी

ग्रामपंचायत पासून विधानसभा लोकसभा या सर्व निवडणुका भाजप – शिवसेना युती म्हणूनच लढवू, सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर विद्यमान आमदार आहेत कणकवली मध्ये भाजपाचे नितेश राणे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे हे विधानसभा मतदारसंघ तेच आमदार निवडणूक लढवतील! कुडाळचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करून ठरवतील. येथील खासदार शिवसेनेचे असल्याने ही जागा शिवसेना लढवेल असे धोरण असले तरीही जागावाटप व युतीबाबत आमचे वरिष्ठ नेते व भाजपचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील. या निर्णयानंतर व ठरणाऱ्या जागा वाटपानंतर शिवसेना-भाजप युती म्हणून निवडणूक लढवू अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बार्शी येथे रिफायनरी प्रकल्प हवा अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे लेखी पत्राने करतात व त्या लेखी पत्रात बारसू येथे प्रकल्प होण्यासाठी पाच कारणे ही नमूद करतात! मात्र आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी केलेला विरोध हा उद्धव ठाकरे यांचा दुटप्पीपणा आता सर्वसामान्य जनतेसमोर आला आहे अशी माहिती सिंधू नगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सिंधुनगरी येथील शासकीय विश्रामगृहावर ही पत्रकार परिषद झाली. यावेळी उदय सामान बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे आदी उपस्थित होते.
बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लेखी पत्र पाठवून विनंती केली होती. या पत्रात त्यानी पाच मुद्दे नमूद केले होते. हा जगातील मोठा प्रकल्प आहे, या प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या जमिनीमध्ये म्हणजे 1000 एकर मध्ये कोणती घरे किंवा विकास नाही त्यामुळे या प्रकल्पासाठी जागा योग्य आहे, या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास होणार नाही, या प्रकल्पामुळे राज्याचे दळवी उत्पन्न वाढणार आहे व जी डी पी दर ८.५ ने वाढेल, या प्रकल्पामुळे पेट्रोल केमिकल दरही कमी होऊन राज्याचा फायदा होईल त्यामुळे हा प्रकल्प बारसू येथे हवा असे नमूद करून लेखी पत्राने मुख्यमंत्र्यांना विनंती करणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून उतरल्यानंतर प्रकल्प नको म्हणतात हे त्यांच्या दुटप्पीपणाचे उदाहरणच म्हणावे लागेल असे स्पष्ट करा त्यांच्या भूमिकेचा पोलखोल केला. मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प त्यांना हवा होता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर त्यांना हा प्रकल्प नको झाला, नक्कीच संशयास्पद वाटते. व यामागे काहीतरी घटना घडली असेल असाही टोला नामदार उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बारसू आंदोलनात मारहाण आरोप होत आहे याविषयी बोलताना ते म्हणाले कोणत्याही आंदोलकांना मारहाण झाली नाही व तशी कोणतीच घटना झालेली नाही उलट या आंदोलनात काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी घुसून वातावरण बिघडवत आहेत. खरंतर आता आंदोलकांची एक बैठक राजापूर येथे सुरू असल्याची ही माहिती त्यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासाबद्दल बोलताना ते म्हणाले वेंगुर्ला व देवगड येथील बस स्टँड साठी प्रत्येकी दोन कोटी रुपये प्रमाणे 4 कोटी मंजूर झाले आहेत. कणकवली बस स्टँड बीओटी तत्त्वावर विकसित करण्याची भूमिका रद्द करून या बस स्थानकाचा विकास केला जाणार आहे, त्यासाठी लागेल तो निधी शासनाने देण्याचे मान्य केले आहे तर चिपी येथील विमानतळाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेंही उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी स्पष्ट केले.